लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग
लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग (पूर्ण व्हिडिओ खाली दिला आहे) लखीमपूर खिरीः यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा ( lakhimpur kheri incident ) मृत्यू झाल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका छोट्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थार गाडीतून उतरून पळून जाताना दिसतोय. हे वाहन केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे आहे. हे वाहन आपले आहे. मात्र, त्यावेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असा दावा आशिष मिश्रा यांनी केला आहे. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओत थार कारमधून पळून जाणारी व्यक्ती आपणच आहोत, असा दावा सुमित जयस्वाल ( sumit jaiswal ) नावाच्या व्यक्तीने केला आहे. काय घडलं रविवारी त्यावेळी? हा सर्व प्रसंग जयस्वालनी कथन केला. कार्यक्रमस्थळावरून (केशव प्रसाद मौर्य) यांचे स्वागत करण्यासाठी जात होतो. वाटेत आम्ही आंदोलकांमधून जात असताना काहींनी कार लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर कारवर दगडफेक सुरू झाली. आडवा त्यांना... असे अनेक जणांचे आवाज येत होत...