पोस्ट्स

mpsc लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शासकीय सेवेत ५,८०० पदांची भरती ; लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव सादर

इमेज
 मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सुमारे ५,८०० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मागणीपत्रे अद्यापही प्राप्त होत असून पदांची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली. बऱ्याच वर्षांनंतर राज्य शासकीय सेवेत मोठय़ा प्रमाणावर नोकरभरती होत आहे. राज्य शासनाच्या वतीने जुलैमध्ये शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीकडे संबंधित विभागांनी पदभरतीचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु शासनस्तरावर त्याबाबत फार काही हालचाली झाल्या नाहीत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेत ३० सप्टेंबपर्यंत सर्व विभागांना पदभरतीसंबंधीचे एमपीएससीकडे मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वच विभागांनी धावपळ करून मागणीपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू केली. राज्य शासनाच्या विविध विभागांकडून ८ ऑक्टोबपर्यंत एमपीएससीकडे ५,७१७ पदांच्या भरतीसाठी मागणीपत्रे, तर आतापर्यंत ५,८०० पदांच्या भरतीसाठी मागणीपत्र प्राप्त झाल्याच...