काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा सरळसेवा भरतीचे कंत्राट!
प्रतिनिधिक छायाचित्र
|| देवेश गोंडाणे
पोलीस भरतीसाठी अॅपटेक कंपनीची निवड; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?
नागपूर : ‘महाआयटी’कडून सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या मेसर्स अॅपटेक लिमिटेड या काळ्या यादीतील कंपनीमार्फत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतरही पोलीस शिपाई भरतीसाठी पुन्हा याच कंपनीची निवड करण्यात आल्याने सरळसेवा भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Amazon वरती शेवटचे काही तास 45% डिस्काउंट मिळवा (आज रात्री 12 पर्यंत
)

राज्यात दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट-ब, क आणि ड संवर्गातील सरळसेवा पदभरतीप्रक्रियेसाठी ‘महाआयटी’कडून चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सरळसेवा भरतीअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. या कंपन्यांच्या निवडीपासूनच त्यांच्या पादर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होता. ‘एमआयडीसी’च्या परीक्षेची जबाबदारी ही मेसर्स अॅपटेक लिमिटेड कंपनीकडे देण्यात आल्यावर ही कंपनी काळ्या यादीत असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने उघड केली होती. त्यानंतर ‘एमआयडीसी’ची उर्वरित पदांची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. १८ ऑक्टोबरपासून रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत भरती होणार आहे. यासाठी अॅपटेक लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी काळ्या यादीत असल्याचे प्रकरण गाजल्यानंतर कंपनीला ‘महाआयटी’कडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, यानंतरही याच कंपनीमार्फत परीक्षा होणार आहे.
कंपनीचा इतिहास...
२०२० मध्ये दिल्ली सरकारमधील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाच्या ११ फेब्रुवारी २०२१च्या निर्णयानुसार मेसर्स अॅपटेक लिमिटेड कंपनीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावत काळ्या यादीत टाकण्यात आले. उत्तरप्रदेश सरकारमधील कनिष्ठ विद्युत अभियंता पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीन वर्षांसाठी मेसर्स अॅपटेक लिमिटेडला काळ्या यादीत टाकले आहे.
Amazon वरती शेवटचे काही तास 45% डिस्काउंट मिळवा (आज रात्री 12 पर्यंत
)

सरळसेवेसाठी कंपन्यांची निवड आम्ही करून दिली आहे. निवड केलेल्या चार कंपन्यांमधून कुठल्या कंपनीकडून परीक्षा घ्यायची हे संबंधित विभाग ठरवत असतो. त्यामुळे पोलीस भरतीमधील कंपनी निवडीशी आमचा संबंध नाही.- प्रसाद कोलते, मुख्य संचालक अधिकारी, महाआयटी.
Source: Loksatta_Online
Amazon वरती शेवटचे काही तास 45% डिस्काउंट मिळवा (आज रात्री 12 पर्यंत
)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Comment