जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी !
जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी !
https://t.me/marathivrttapatra
मुकेश अंबानी, जेफ बेझॉस, इलन मस्क
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचा १०० अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असलेल्या गटात समावेश झाला आहे, त्यामुळे ते आता जेफ बेझॉस, इलन मस्क यांच्या यादीत जाऊन बसले आहेत.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष असून ते आता मोजक्या ११ उद्योगपतींच्या गटात आले आहेत ज्यांची संपत्ती शंभर अब्ज डॉलर आहे.
शुक्रवारी रिलायन्सचा शेअर वधारला. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत भर पडून ती आता १००.६ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात त्यांची दखल घेण्यात आली असून त्यांची संपत्ती २३.८ अब्ज डॉलरने वाढली आहे.
तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल उद्योगात त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांना मिळाला. त्यातून नंतर ते किरकोळ विक्री क्षेत्र, तंत्रज्ञान, इ व्यापार यातही उतरले. त्यांनी २०१६ मध्ये दूरसंदेशवहन सेवा सुरू केली असून आता भारतात ती जोमाने सुरू आहे. त्यांनी गेल्या वर्षी किरकोळ विक्री क्षेत्र व तंत्रज्ञान या क्षेत्रात २७ अब्ज डॉलरची उलाढाल केली होती. फेसबुक, गुगल, केकेआर व सिल्वर लेक कंपन्यांना त्यांनी काही समभाग विकले होते. जूनमध्ये त्यांनी ऊर्जा क्षेत्रात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक तीन वर्षात करण्याचे जाहीर केले आहे. स्वस्तात हरित हायड्रोजनची निर्मिती करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता.
१९६० मध्ये मुकेश यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी येमेन येथे एका गॅस स्टेशनवर काम सुरू केले होते. नंतर त्यांनी पॉलिस्टर उद्योगात मोठे साम्राज्य उभारले. २००२ मध्ये धीरूभाई यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी इच्छापत्र केलेले नव्हते. त्यामुळे मुकेश व अनिल अंबानी यांच्यातील वाद त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांनी मिटवले होते. त्यात मुकेश यांच्याकडे तेल शुद्धीकरण व पेट्रोरसायनां उद्योगांचा वाटा आला होता. त्यांचे बंधू अनिल यांना ऊर्जा, आर्थिक सेवा, दूरसंचार हे उद्योग मिळाले होते.
अनिल अंबानी एकेकाळी अब्जाधीश होते पण त्यांनी गेल्यावर्षी लंडनच्या न्यायालयात सगळी संपत्ती गमावल्याचे जाहीर केले होते.
नवनव्या उद्योगांत आघाडी
मुंबईतील टीसीजी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी चक्री लोकप्रिया यांनी म्हटले आहे की, मुकेश अंबानी हे नवनवीन उद्योग व तंत्रज्ञान यात आघाडीवर आहेत.
source: LoksattaOnline
◉𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐚𝐧𝐝 𝐬𝐮𝐠𝐠𝐞𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 𝐭𝐨 𝐣𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐜𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐥𝐢𝐧𝐤 ↡↡

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Comment