पोस्ट्स

काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा सरळसेवा भरतीचे कंत्राट!

इमेज
  प्रतिनिधिक छायाचित्र || देवेश गोंडाणे पोलीस भरतीसाठी अ‍ॅपटेक कंपनीची निवड; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह? नागपूर : ‘महाआयटी’कडून सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड या काळ्या यादीतील कंपनीमार्फत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका झाल्यानंतरही पोलीस शिपाई भरतीसाठी पुन्हा याच कंपनीची निवड करण्यात आल्याने सरळसेवा भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   Amazon वरती शेवटचे काही तास 45% डिस्काउंट मिळवा (आज रात्री 12 पर्यंत ) राज्यात दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट-ब, क आणि ड संवर्गातील सरळसेवा पदभरतीप्रक्रियेसाठी ‘महाआयटी’कडून चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांच्या सरळसेवा भरतीअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या खासगी कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. या कंपन्यांच्या निवडीपासूनच त्यांच्या पादर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होता. ‘एमआयडीसी’च्या परीक्षेची जबाबदारी ही मेसर्स अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडे देण्यात आल्यावर ही कंपनी काळ्या यादीत असल्याची बाब ‘लोकसत्ता’ने उघड केली होती. त्यानंतर ‘एमआयडीसी’ची उर्व...

शासकीय सेवेत ५,८०० पदांची भरती ; लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव सादर

इमेज
 मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सुमारे ५,८०० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मागणीपत्रे अद्यापही प्राप्त होत असून पदांची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली. बऱ्याच वर्षांनंतर राज्य शासकीय सेवेत मोठय़ा प्रमाणावर नोकरभरती होत आहे. राज्य शासनाच्या वतीने जुलैमध्ये शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीकडे संबंधित विभागांनी पदभरतीचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु शासनस्तरावर त्याबाबत फार काही हालचाली झाल्या नाहीत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेत ३० सप्टेंबपर्यंत सर्व विभागांना पदभरतीसंबंधीचे एमपीएससीकडे मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्वच विभागांनी धावपळ करून मागणीपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू केली. राज्य शासनाच्या विविध विभागांकडून ८ ऑक्टोबपर्यंत एमपीएससीकडे ५,७१७ पदांच्या भरतीसाठी मागणीपत्रे, तर आतापर्यंत ५,८०० पदांच्या भरतीसाठी मागणीपत्र प्राप्त झाल्याच...

लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग

इमेज
 लखीमपूरमध्ये काय घडलं नेमकं? व्हायरल व्हिडिओतील एका व्यक्तीने सांगितला जीवावर बेतलेला प्रसंग (पूर्ण व्हिडिओ खाली दिला आहे) लखीमपूर खिरीः  यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा (  lakhimpur kheri incident  ) मृत्यू झाल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका छोट्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती थार गाडीतून उतरून पळून जाताना दिसतोय. हे वाहन केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांचे आहे. हे वाहन आपले आहे. मात्र, त्यावेळी आपण घटनास्थळी नव्हतो, असा दावा आशिष मिश्रा यांनी केला आहे. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओत थार कारमधून पळून जाणारी व्यक्ती आपणच आहोत, असा दावा सुमित जयस्वाल (  sumit jaiswal  ) नावाच्या व्यक्तीने केला आहे. काय घडलं रविवारी त्यावेळी? हा सर्व प्रसंग जयस्वालनी कथन केला. कार्यक्रमस्थळावरून (केशव प्रसाद मौर्य) यांचे स्वागत करण्यासाठी जात होतो. वाटेत आम्ही आंदोलकांमधून जात असताना काहींनी कार लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर कारवर दगडफेक सुरू झाली. आडवा त्यांना... असे अनेक जणांचे आवाज येत होत...

जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी !

इमेज
जगातील शंभर अब्ज डॉलर संपत्तीधारकांत मुकेश अंबानी ! https://t.me/marathivrttapatra मुकेश अंबानी, जेफ बेझॉस, इलन मस्क आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचा १०० अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असलेल्या गटात समावेश झाला आहे, त्यामुळे ते आता जेफ बेझॉस, इलन मस्क यांच्या यादीत जाऊन बसले आहेत. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष असून ते आता मोजक्या ११ उद्योगपतींच्या गटात आले आहेत ज्यांची संपत्ती शंभर अब्ज डॉलर आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर वधारला. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत भर पडून ती आता १००.६ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात त्यांची दखल घेण्यात आली असून त्यांची संपत्ती २३.८ अब्ज डॉलरने वाढली आहे. तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल उद्योगात त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांना मिळाला. त्यातून नंतर ते किरकोळ विक्री क्षेत्र, तंत्रज्ञान, इ व्यापार यातही उतरले. त्यांनी २०१६ मध्ये दूरसंदेशवहन सेवा सुरू केली असून आता भारतात ती जोमाने सुरू आहे. त्यांनी गेल्या वर्षी किरकोळ विक्री क्षेत्र व तंत्रज्ञान या क्षेत्रात २७ अब्ज डॉलरची ...